Friday, July 26, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील एका खाजगी बंगल्यात पोलिसांची कारवाई, सहा जणांसह चार बारबालांना घेतले ताब्यात…

लोणावळ्यातील एका खाजगी बंगल्यात पोलिसांची कारवाई, सहा जणांसह चार बारबालांना घेतले ताब्यात…

लोणावळा (प्रतिनिधी): कुरवंडे (ता. मावळ) याठिकाणी एका खाजगी बंगल्यात मोठ्या आवाजात डीजे लावून सोबत आणलेल्या बारबालांसह अश्लील हावभाव करीत नाचणाऱ्या दहा जणांवर आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये बंगला मालक, बंगला चालक व केअर टेकर यांनादेखील आरोपी करण्यात आले आहे.शनिवार दि 1 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजता ही कारवाई करण्यात आली.
लोणावळा उपविभागीय अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना गोपणीय बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की,कुरवंडे ता. मावळ जि. पुणे गावाच्या हद्दीत शर्मा व्हिला या खाजगी बंगल्यात बरेच लोक सार्वजनिक शांततेचा भंग होईल असे साऊंड सिस्टीम लावुन मोठमोठ्याने गाणी लावुन अश्लिल हावभाव करीत बारबाला यांना आपल्यासह नाच करायला लावत आहेत. सदर बातमी मिळाल्याने आयपीस सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे हाताखालील पोलीस स्टाफ यांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी सदर ठिकाणी शिवाजी रामचंद्र भोसले (वय 50 वर्षे, रा. पंढरपुर रोड, ता. सांगोला, जि. सोलापुर), अभिजीत मच्छिंद्र सोनलकर (वय 37 वर्षे, रा. वंदे मातरम चौक, सांगोला, जि. सोलापुर), धनाजी अर्जुन जगताप ( वय 37 वर्षे, रा. कडलस नाका, ता. सांगोला, जि. सोलापुर), संतोष नामदेव शिंदे (वय 48 वर्षे, राबलवडी, ता सांगोला, जि सोलापुर), प्रविण चंद्रमोहन पैलवान (वय 48 वर्षे, रा. वझराबाद पेठ, सांगोला, जि सोलापुर) आणि फिरोज जहांगीर तांबोळी (वय 45 वर्षे, रा.भवानी चौक, सांगोला, जि सोलापुर) या सहा जनांसह 4 महिला अश्लिल हावभाव करीत नाचत असल्याचे मिळून आल्या.याप्रकरणी सर्वांना ताब्यात घेऊन लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 83/2023 भा.द.वि.294,188,34 सह म.पो.अधि.कलम 33 (एन) 131 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच वरील गुन्ह्यास सहाय्य करणारे बंगाला मालक श्रेयश शर्मा (रा. मुंबई) सदरचा बंगला भाड्याने घेवुन चालविणारे लक्ष्मण दाभाडे (रा. लोणावळा) व बंगल्याचा केअर टेकर कैलास पवार (रा. खंडाळा, लोणावळा) तसेच गुरु पाटील (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सदरची कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार अंकुश नायकुडे, जयराज पाटणकर, म.पो.हवा.आशा कवठेकर, चा.पो.शि. अंकुश पवार, पो.शि.सुभाष शिंदे,मनोज मोरे यांनी केली आहे.पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयराज पाटणकर हे पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page