लोणावळ्यातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल.

0
2341

लोणावळा दि.18: लोणावळा शहरातील ओळकाईवाडी येथील एका घटस्फोट महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिची तीन लाख साठ हजार रोख रुपये व 11तोळे सोने गंडवणाऱ्या नराधमास लोणावळा शहर पोलीसांनी केली अटक.


2018 ते 2021 पर्यंत एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याकडून रुपये लाटून तिची फसवणूक केल्या प्रकरणी देवानंद ज्ञानेश्वर साठे ( रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे ) याने सदर महिलेची विवाह नोंदणी मेळाव्यातून सर्व माहिती घेत तिच्याशी जवळीक साधत 2018 ते आत्तापर्यंत तिच्याशी शारीरिक संबंध करत आर्थिक अडचण असल्याचे सांगत तीन लाख साठ हजार रुपये रोख व अकरा तोळे सोने लाटल्याची तक्रार लोणावळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली.

त्या अनुषंगाने लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारीलोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार लोणावळा पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्या विरोधात भा. द. वी. कलम 376,420,406,170 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मा. न्यायदंडाधिकारी वडगाव मावळ यांनी त्यास 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार करत आहेत.