Sunday, June 23, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील कल्पतरू रुग्णालयातील एका सेवकाचा अहवाल पॉझिटिव्ह...

लोणावळ्यातील कल्पतरू रुग्णालयातील एका सेवकाचा अहवाल पॉझिटिव्ह…

लोणावळ्यातील कल्पतरू हॉस्पिटल लॅब मधील कामगाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी ह्याच हॉस्पिटल मधील डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. आणि त्यानंतर मी स्वतः ला घरीच क्वारंटाईन केल्याचा डॉक्टरने व्हिडिओ व्हायरल केला होता.

त्या नंतर हॉस्पिटल मधील इतर स्टाफचे swab तपासणी साठी पाठविले असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यातील ह्या डॉक्टरच्या संपर्कात राहणाऱ्या, हॉस्पिटलच्या लॅब मध्ये काम करणाऱ्या ह्या व्यक्तीचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे, त्याचबरोबर कोणार्क प्याराडाइज पांगोळी येथील एक दाम्पत्य पॉझिटिव्ह आढळले आहे त्यातील महिला ही बाळंतपनासाठी कल्पतरू हॉस्पिटल मध्ये दाखल होती.बाळंत झाल्या नंतर तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि तीच्या पतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

याचप्रमाणे कित्तेक रुग्ण ह्या हॉस्पिटल मध्ये येत आहेत, हॉस्पिटल मधील स्टाफ आहे,हे शहरातील नावाजलेले हॉस्पिटल आहे त्यामुळे प्रशासन ह्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करणे आपल्या शहरासाठी कोरोना संकटाला चालना दिल्यासारखे होईल. आणि पुढे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये याकरिता ह्या काळात कल्पतरू रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी प्रशासनाने करावी व त्याचा अहवाल सादर करावा. अन्यथा लोणावळ्यातील कोरोनाचा संसर्ग आणखी वाढेल.सदर हॉस्पिटल मध्ये आणखी दोन डॉक्टर आहेत त्यांचे swab तपासणी साठी घेतले नाही जर swab घेतले असल्यास त्याची कुठलीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

हे शहरातील मोठे वा नावाजलेले रुग्णालय असल्याने नगरपरिषद ह्या डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याचा अंदाज सूत्रांकडून वर्तविला जात आहे.हे रुग्णालय नावाजलेले असले तरी याची वा इथे येणाऱ्या रुग्णांची तसेच शहरातील नागरिकांच्या सुरक्षे संदर्भातील दक्षता स्थानिक प्रशासनाने घ्यावी व मावळ तहसीलदार आणि जिल्हाधिकारी पुणे यांनी याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page