Sunday, December 8, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे...

लोणावळ्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे..आमदार सुनील शेळके..

लोणावळा : दि. 5, कोविड 19 च्या काळात दहा दिवसांमध्ये लोणावळा खंडाळा शहरातील अनेक कोरोना रुग्ण दगावले आहेत. शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर कशा उपाययोजना राबविण्यात येतील यासंदर्भात आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या उपस्थितीत एका सभेचे आयोजन लोणावळा कृष्णाई रिसॉर्ट येथे करण्यात आले होते.
त्यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवी पवार, लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे एपीआय वैभव स्वामी, जिवन गायकवाड, निखिल कवीश्वर, विलास बडेकर, धंनजय काळोखे, बाळासाहेब पायगुडे, मुकेश परमार, मंजुश्री वाघ, नारायण पाळेकर, भारत चिकणे, दिनेश कालेकर, प्रकाश हारपुडे व लोणावळा खंडाळा व्यापारी संघटनेचे सदस्य तसेच सुनील अण्णा शेळके युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.
लोणावळा खंडाळा शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी येथील सामाजिक संघटना व प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. अनलॉक झाल्यापासून लोणावळा खंडाळा शहरात मुंबई पुणे कडील अनेक पर्यटकांचा वावर वाढला आहे. अशा परिस्थितीत सर्व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग पाळत सेनेटायझरचा वापर करत आपला व्यवसाय करावा, परिसरातील रिक्षा, टॅक्सी व्यावसायिकांनी आपल्या वाहनातून शासनाने दिलेल्या ग्राहकांच्या संख्येप्रमाणेच व्यवसाय करावा. परिसरातील बंगले ग्राहकांना भाडे तत्वावर देत असताना तिथे राहणारे पर्यटक व कामगार यांनी खबरदारी बाळगत सर्व शासकीय सूचनांचे पालन करत व्यवसाय करावा.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत खाजगी रुग्णालयात केलेल्या कोविड 19 तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास अनेक नागरिक ही माहिती शासनापासून लपवत आहेत, शासनाला त्या व्यक्ती संदर्भात कुठलीही माहिती नसल्यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही कोरोनाची लागण होत आहे.
सध्या आठ दिवसांमध्ये शहर व परिसरातील अनेक नागरिक कोरोनामुळे दगावले आहेत त्यामुळे शासनाकडून आपल्याला चांगल्या प्रतीची वैद्यकीय सेवा मिळेल का ? किंवा आपण पॉझिटिव्ह आल्यास समाज आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहील अशे गैरसमज मनात न आणता पॉझिटिव्ह असल्यास त्याची पूर्ण कल्पना प्रशासनाला दयावी, नागरिकांनी सर्व शासकीय सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आपले व्यवसाय करावेत. सूचनांचे पालन नकेल्यास पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
आपल्या शहराला कोरोना महामारी पासून सुरक्षित ठेवण्या करीता प्रशासकीय पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत परंतु नागरिकांनी सहकार्य करत आपली काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले. आणि आजपासून लोणावळ्यात दोन रुग्णवाहिका कार्यरत राहतील, कोविड टेस्ट ज्यांना करायची असल्यास लोणावळा व वडगाव याठिकाणी मोफत कोविड टेस्टची सुविधा सुरु करण्यात आली आहे, उपचार घेण्याच्या ठिकाणी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, सी सी सी असा स्वतंत्र कक्ष सुरु केलेला आहे.
तसेच लोणावळा शहरात ज्याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे त्या परिसरात नगरपरिषदेकडून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले, तसेच शहरातील कोरोनाची संख्या आटोक्यात न आल्यास नागरिकांकडून जनता कर्फ्यू संदर्भात जो निर्णय घेण्यात येईल त्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा राहील असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत ही सभा पार पडली.
- Advertisment -

You cannot copy content of this page