लोणावळ्यातील जेष्ठ पत्रकार दत्तात्रय गवळी आणि माजी नगरसेवक बाळासाहेब कडू यांचा कोरोनामुळे मृत्यू..

0
1350

लोणावळा शहरात आज दोन प्रतिष्ठित व्यक्तींचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे. याने संपूर्ण लोणावळा शहरावर शोककळा पसरली असून या दोघांनाही भावपुर्ण श्रद्धांजली म्हणून पूर्ण लोणावळा बाजारपेठ व गावळीवाडा दुपारनंतर बंद करण्यात आली आहे.

जेष्ठ पत्रकार, बुलंद मावळ साप्ताहिकाचे संपादक, तसेच लोणावळा नगरीतील एक उत्कृष्ट समाजसेवक अशी संपूर्ण मावळ तालुक्यात प्रसिद्ध असलेले आमचे दत्ताभाऊ गवळी यांचे कोरोनामुळे निधन झाले. तर माजी नगरसेवक बाळासाहेब कडू यांच्यावरही कोरोनाने घाला घातला असता त्यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील ह्या दोन प्रमुख व्यक्तींच्या मृत्यू वार्तेने संपूर्ण मावळ तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.लोणावळावळ्यातील ह्या संजसेवकांना अष्ट दिशा न्यूजच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली…