Friday, June 14, 2024
Homeक्राईमलोणावळ्यातील डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यातील दरोड्यातील पंधरा आरोपी एल सी बी च्या...

लोणावळ्यातील डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यातील दरोड्यातील पंधरा आरोपी एल सी बी च्या जाळ्यात…

लोणावळा दि.29 : लोणावळ्यातील डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या राहत्या बंगल्यावर दि.17 जून रोजी पहाटेच्या वेळी सशस्त्र दरोडा घालण्यात आला होता. सदर दरोड्यात डॉ. खंडेलवाल व त्यांच्या पत्नी यांचे हात पाय बांधून धारदार शस्त्राचा धाक दाखवून आरोपींनी दरोडा घालत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह 67 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता.

सदर गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र मनोज लोहिया,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट.

लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांची पथके सदर गुन्ह्याचा तपास करताना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या ठिकाणचे व आजूबाजूचे सी सी टिव्ही फुटेजच्या आधारे, तांत्रिकी विश्लेष्णाद्वारे आणि गोपनीय सूत्रांकडून माहिती काढत आठ आरोपींना या आधीच अटक केली होती.

परंतु त्यांच्याकडून केलेल्या तपासातून गुन्ह्याचे मुख्य आरोपी हे मध्यप्रदेश मध्ये असून त्यांच्याजवळ गुन्ह्यातील मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, पोलीस हवालदार सुनील जावळे, शब्बीर पठाण, मुकुंद अयाचित, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, मुकेश कदम, प्रकाश वाघमारे, महेश गायकवाड, निलेश कदम, अक्षय नवले यांचे तपास पथक मध्यप्रदेश येथे आरोपींच्या शोधात तीन आठवडे तळ ठोकून होते.

या पथकाने तसेच सचिन गायकवाड व राजू मोमीन यांच्या तांत्रिक मदतीने मध्यप्रदेश मधील सागर जिल्ह्यातील गंज बासौदा, राहतगड, डांबरी येथून पाच मुख्य आरोपींसमवेत दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोणावळा शहर पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस नाईक जयराज पाटणकर, पोलीस कॉन्स्टेबल धनवे हे करत आहेत.

दरोड्यातील पंधरा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत,हेमंत रंगराज कुसवाह ( वय 24, रा. डांबरी, ता. राहतगड, जि. सागर, राज्य मध्यप्रदेश ), नथू साधू विश्वासराव ( देशमुख ) वय 52,रा. औंढोली, ता. मावळ, जि. पुणे, सुनील शंकर शेजवळ (वय 40, सध्या रा. देवकीनंदन चाळ, जवाहरभाई प्लॉट, आर. बी. कदम मार्ग, भटवाडी, घाटकोपर वेस्ट मुंबई मूळ रा. लाखनगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे), रवींद्र काशीराम पवार ( वय 42, संभाजीनगर,6 रोड, स्वामी नित्यानंद मार्ग, अंधेरी वेस्ट ), शामसुंदर शिवनाथ शर्मा ( वय 43, आरे मिल्क कॉलनी युनिट 7, देवीचा पाडा, गोरेगाव पूर्व, मुंबई )

मुकेश रमेश राठोड (वय 45, रा. भटवाडी, मच्छि मार्केट जवळ, घाटकोपर वेस्ट, मुंबई ), सागर रमेश धोत्रे ( वय 25, रा. शंकर मठ, हडपसर, पुणे ),प्रशांत उर्फ हेमंत रंगराज कुसवाह उर्फ पटेल ( वय 27,रा.डांबरी, पो. चंद्रपूर ग्रामपंचायत बहादूर पूर, ता. राहतगड, जि. सागर, मध्यप्रदेश ), दिनेश जयराम अहीरे ( वय 38, कमला तिवारी चाळ, पारशिवाडी, घाटकोपर ( प ) मुंबई ), विकास शंकर गुरव ( वय 34, रा. सांताक्रुज पूर्व, दत्त मंदीर, वाकोला, मुंबई ), संजय भगवान शेंडगे ( वय 47, रा. जवाहर भाई प्लॉट, भटवाडी, घाटकोपर ( प )मुंबई ), दौलत भावसिंग पटेल ( वय 24, रा. डांबरी, चंद्रापूर ग्रामपंचायत बहादूरपूर, ता. राहतगड, सागर, मध्यप्रदेश )

विजय चंद्रप्रकाश पटेल ( वय 21, रा. वल्लभनगर वार्ड, शाहूचौक, जि. सागर, मध्यप्रदेश ), गोविंद भानसिंग कुशवाह ( वय 18, रा. डांबरी, चंद्रापूर ग्रामपंचायत बहादूरपूर, ता. राहतगड, जि. सागर, मध्यप्रदेश ) व प्रदीप लल्लू धानूक ( वय 28, रा. डांबरी, पो. चंद्रापूर ग्रामपंचायत बहादूरपूर, ता. राहतगड, जि. सागर, मध्यप्रदेश ) तसेच मुख्य आरोपी हेमंत रंगराज कुसवाह हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध गोवा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या राज्यात घरफोडी व चोरी यासारखे चार गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page