लोणावळ्यातील निसर्गसोसायटी मध्ये दोन घरफोडया…अज्ञात चोरट्याने केला 3 लाख 57 हजाराचा ऐवज लंपास…

0
1198

लोणावळा दि.25: लोणावळा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या निसर्गनगरी सोसायटीत दोन घरफोडया अज्ञात चोरट्याकडून एकूण 3लाख 57 हजाराचा ऐवज लंपास.त्यासंदर्भात सुरेखा भीमा शिंदे ( वय 65, रा. निसर्गनगरी सोसायटी, बिल्डिंग नं.11, ग्राउंड फ्लोअर, फ्लॅट नं.2) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये गु. र. नं.90/2021, भा. द. वी. कलम 454, 457, 380, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोणावळा पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि.24 रोजी सायंकाळी 4 ते दि.25 रोजी सकाळी 11 वा. च्या सुमारास निसर्गनगरी सोसायटीतील बिल्डिंग नं.11 मधील सुरेखा भीमा शिंदे यांच्या फ्लॅट नं.2 च्या दरवाजाचे कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने कापडाच्या गाठोड्यात ठेवलेले गौरी गणपतीचे दागिने अंदाजे 20 हजार किमतीचे दोन चांदीचे मुखवटे,25 हजार रु. किमतीचे देवीचे सोन्याचे दोन लक्ष्मी हार,9 हजार रु. किमतीचे तीन चांदीचे मुगुट,7 हजार 500 रु.किमतीच्या देवीच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाच्या दोन वाट्या,30 हजार रु. किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस,1 लाख रु. किंमतीची गणपतीच्या गळ्यातील चार तोळ्याची चैन,20 हजार रु. किमतीचे दोन चांदीचे कमर पट्टे,10 हजार रु. किमतीच्या लहान मुलांच्या चार ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या,5 हजार रु. किमतीच्या लहान मुलांच्या कमरेच्या चांदीच्या साखळ्या असा एकूण अंदाजे 2 लाख 26 हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

तर त्याच सोसायटीतील बिल्डिंग नं.6 मधील दिपक नंदकुमार अगरवाल यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून कपाटातील 75 हजार रु. किमतीचे तीन तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र,25 हजार रु. किमतीचे एक तोळा वजनाचे मिनी गंठण,10 रु. किमतीचे प्रत्येकी दोन ग्रॅम वजनाचे दोन कानातील टॉप्स,20 हजार रु. किमतीची डायमंड अंगठी व 1हजार रु. किमतीचे हातातील घड्याळ असा अंदाजे एकूण 1 लाख 31 हजाराचा ऐवज असा एकूण 3लाख 57 हजार 500 रु. ऐवज चोरट्याने लंपास केला असून त्यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा प्रथम अहवाल वडगाव न्यायालयात सादर केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत.