Sunday, December 8, 2024
Homeक्राईमलोणावळ्यातील बाल रोग तज्ञ डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर दरोडा पन्नास लाख रोख...

लोणावळ्यातील बाल रोग तज्ञ डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर दरोडा पन्नास लाख रोख व दागिने…

लोणावळ्यातील बाल रोग तज्ञ डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर दरोडा पन्नास लाख रोख व दागिने एकूण अंदाजे 66,77,500 चा मुद्देमाल लंपास.

लोणावळा दि.17: 20 ते 25 वर्ष वयोगटातील पाच ते सहा अनोळखी शस्त्रधारी इसमांनी लोणावळ्यातील सुप्रसिद्ध डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल (बाल रोग तज्ञ ) यांच्या प्रधानपार्क, खंडेलवाल हॉस्पिटल येथील राहत्या बंगल्यात जबरदस्तीने घुसून शस्त्राचा धाक दाखवून 66,77,500 रोख रक्कम व ऐवज लंपास केल्याची घटना दि.17 रोजी पहाटे 1ते 3 वा. च्या सुमारास घडली.

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार 20 ते 25 वयोगटातील 5 ते 6 अनोळखी इसम डॉ. खंडेलवाल यांच्या राहत्या बंगल्यात खिडकीद्वारे जबरदस्तीने घुसले त्यावेळी डॉ व त्यांची पत्नी हे त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असताना सदर आरोपींनी त्या दोघांचे हात पाय सुताच्या दोरीने बांधले आणि धारदार चाकूचा धाक दाखवून धमकी देऊन बंगल्यातील 50,00,000/- अंदाजे रोख रक्कम त्यामध्ये 2,000 रु दराच्या 1,500 नोटा व 500 रू दराच्या 4,000 नोटा अशी रोख रक्कम व अंदाजे 10 तोळे वजनाचे पाच नेकलेस,1,47,000 – अंदाजे 3 तोळे वजनाचा एक लॉग सोन्याचे गंठन, 1,96,000 – अंदाजे 4 तोळे वजनाच्या 4 सोन्याच्या बांगडया,1,47,000 – अंदाजे 3 तोळे वजनाच्या 4 सोन्याच्या बांगडया, 55,000 – 1 सोन्याची चैन त्यास पाच ठिकाणी डायमंडच्या फुलांची डिझाईन केलेली , 1,00,000 – 1 व्हाईट गोल्ड (सोने) चैन त्यास तीन बारीक पदर असलेले त्यावर डायमंडचे नक्षीकाम केलेले,3,20,000 – 4 डायमंड धातुच्या अंगठया, 1,00,000 – 2 डायमंड धातुच्या बांगडया, 1,22,500 – देव घरातील देवाच्या प्रत्येकी 1 तोळे वजनाच्या 2 सोन्याच्या अंगठया व अर्धा तोळे वजनाची एक सोन्याची चैन असा ऐवज 66,77,500 -रुपये येणे प्रमाणे वरील वर्णनाचा माल राहत असलेल्या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील बंगल्यामधून लंपास करण्यात आला आहे.

डॉ. खंडेलवाल यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती नुसार आरोपी अंदाजे 20 ते 25 वर्षे वयोगटातील असून त्यांच्या पायात स्पोर्ट शुज, अंगात पॅन्ट शर्ट असा पेहनावा आणि सडपात्तळ, उंच बांधा असलेले हिंदी भाषेतुन बोलणारे असे आरोपींचे वर्णन असून त्या पाच ते सहा शस्त्रधारी इसमांनी घरातील एकुण 66,77,500/- रूपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरून नेला आहे.

त्यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं.60/2021 भा द वि कलम 395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करित आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page