लोणावळ्यातील बिलाल कुरेशी खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात….

0
2556
लोणावळा : लोणावळा इंद्रायणी नगर मध्ये राहणारा बिलाल फय्याज कुरेशी ( वय 28 ) याची दि. 2 रोजी लोणावळा इंद्रायणी नगर येथील बंद भाजी मार्केट मध्ये धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली होती.
त्या खुनातील आरोपी सागर वसंत लोकरे ( वय 32, रा. कुरवंडे लोणावळा ) याला लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे. मयत बिलाल कुरेशी याची आई सुल्ताना फय्याज कुरेशी ( वय 40 ) हिचे आणि आरोपी सागर वसंत लोकरे ( वय 32 ) यांच्या मधील असलेले अनैतिक संबंधाची माहिती बिलालला मिळाल्याने बिलाल व सागर यांच्या मध्ये वाद निर्माण झाला होता.
त्यातून सागरला बिलालकडून धोका निर्माण झाल्यामुळे ही हत्या झाली असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस स्टेशन मधून मिळाली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास लोणावळा शहर पो. निरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.