Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील रिक्षा संघटना अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत.... ह्यांना न्याय मिळणार का ?

लोणावळ्यातील रिक्षा संघटना अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत…. ह्यांना न्याय मिळणार का ?

सुमारे पन्नास वर्षांपासून लोणावळा शहरात रिक्षा व्यवसाय सुरू आहे. ह्या कालावधीत अनेक रिक्षा संस्था, संघटना प्रस्थापित होऊन अल्प कालावधीसाठीच चालल्या. परंतू आता काळ बदलत चालला आहे लोणावळ्याच्या जनसंख्खे नुसार जास्त प्रमाणात रिक्षा वाढत आहेत.आणि लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांमुळे रिक्षा व्यवसायाला चांगलाच प्रतिसाद मिळत होता.

त्यातच देशभरात 2020, मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण जगात लॉक डाऊन लागू झाला. आणि त्यामुळे राज्यातील गोर गरीब कामगार तसेच व्यावसायिकांचे खूप मोठया प्रमाणात हाल अपेष्टा झाल्या. लॉक डाऊन लागू झालेले पाच महिने झाले आहे ह्या पाच महिन्यात कित्येक रिक्षा चालक व मालक यांचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांना खूप हलाकीचे जीवन जगावा लागले. तर काही रिक्षावाल्यांनी आत्महत्या देखील केल्याचे आपण पाहिले आहे.

त्याच संदर्भात महाराष्ट्र राज्यातून अनेक रिक्षा संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देण्यात आली होती. परंतु अद्याप त्याची दखल न होता अजूनपर्यंत रिक्षा संघटनांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. म्हणून शहरातील सर्व रिक्षा संस्था, संघटनांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची ही वेळ असल्यास त्याशिवाय आपणास कुठल्याही प्रकारची मदत, न्याय, हक्क व सन्मान मिळणार नाही. असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश रिक्षा पंचायत उपाध्यक्ष बाबू भाई शेख यांच्या वतीने सर्व रिक्षा चालक मालक संघटनांना करण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page