Sunday, June 23, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील वरिष्ठ नागरिक संघाच्या वतीने दि.11 रोजी बहारदार गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन...

लोणावळ्यातील वरिष्ठ नागरिक संघाच्या वतीने दि.11 रोजी बहारदार गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन…

लोणावळा : शहरातील वरिष्ठ नागरिक संघाच्यावतीने सोमवार दि.11ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता हिंदी मराठी गाण्यांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन चंद्रलोक हॉटेल येथे करण्यात आले आहे.

लोणावळा येथील चंद्रलोक हॉटेल येथे वरीष्ट नागरिक संघातर्फे हिंदी मराठी गाण्याचा एक बहारदार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे सदर कार्यक्रमात प. किरण परळीकर यांचे शीष्य व प्रसिद्ध वकील निलेश अग्रवाल हे गायन सादर करतील.


कार्यक्रमात जुनी हिंदी गाणी, मराठी गाणी व अभंग तसेच कव्वाली यांचा प्रामुख्याने समावेश असेल या गायन मैफिलीत अग्रवाल यांची साथ देतील घनि खंडेलवाल, सत्य अगरवाल, सविता परदेशी तसेच तबल्यावर साथ देतील बॉलिवूड चे प्रसिद्ध तबला वादक उस्ताद शरीफ खान साहेब.कार्यक्रमात कोणतेही प्रवेश शुल्क नसल्याने लोणावळ्यातील रसिक श्रोते नक्कीच गर्दी करतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page