Sunday, June 23, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील वाय.सी.क्लासेस अंतर्गत क्रीडा महोत्सव संपन्न, विध्यार्थ्यांनी घेतला मैदानी खेळांचा आनंद…

लोणावळ्यातील वाय.सी.क्लासेस अंतर्गत क्रीडा महोत्सव संपन्न, विध्यार्थ्यांनी घेतला मैदानी खेळांचा आनंद…

लोणावळा (प्रतिनिधी): वाय. सी. क्लासेस आयोजित अंतर्गत क्रीडा महोत्सव उत्सहात संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाचे आयोजन गवळी वाडा श्रीराम क्रीडा मंडळाच्या मैदानावर दि.29 जानेवारी रोजी करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात क्लासेस मधील अडीचशे विध्यार्थ्यांनी मैदानी खेळांचा आनंद घेतला.यामध्ये क्रिकेट, खो खो, डॉज बॉल,100 मी,200 मी,400 मी.धावणे व कबड्डी यासारखे मैदानी खेळांचा समावेश होता. तसेच कॅरम, चेस, दोर उड्या, संगीत खुर्ची यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.
वाय सी क्लासेसचे संचालक प्रा. एन.व्ही.दुडे यांच्या संकल्पनेतून विध्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर चांगले संस्कार, चांगले आरोग्य व मैदानी खेळांबद्दल रस असावा या उद्देशाने (out door ) आणि (in door ) विविध स्पर्धाचे आयोजन वाय. सी. क्लासेस कडून दरवर्षी करण्यात येत आहे.
क्रीडा महोत्सवाच्या शुभारंभासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष महादू तात्या गवळी, कार्याध्यक्ष अनिल गवळी, उपाध्यक्ष सुधीर शिर्के, निलेश लोखंडे, सूर्यकांत औरंगे, राजू गवळी, वसंत कालेकर, सहादू कालेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष महादू तात्या गवळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. विध्यार्थ्यांना शुभेच्छा देताना निखिल कवीश्वर यांनी मोजक्या शब्दात वाय. सी. क्लासेसच्या उपक्रमांचे कौतुक केले, तर प्रा. दुडे यांनी या क्रीडा महोत्सवा बद्दलची भूमिका व्यक्त करताना “सध्याची पिढी सततच्या मोबाईल वापरामुळे जानुकाही मैदानाच विसरले आहेत. मोबाईल आणि अभ्यास हेच त्यांचे विश्व् झाले आहे.
अगदी लहान वयातच आरोग्या विषयीच्या अनेक समस्या निर्माण झाल्याचे दिसत आहे.मातीत खेळण्यात आनंद असतो हा समज त्यांच्यामध्ये निर्माण करण्याची गरज आहे.विध्यार्थ्यांना उत्तम अभ्यास, चांगले संस्कार आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी क्लासेस कडून विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच या क्रीडा महोत्सवातील खेळांसाठी मैदान उपलब्ध करून दिल्या बद्दल श्रीराम मित्र मंडळाचे आभार व्यक्त केले.
सदर क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वाय सी क्लासेसचे शिक्षक दिपेश गोणते(सर),खोब्रागडे सर,मयूर सर,शिक्षिका सुजाता मोहिते तसेच काही माजी विद्यार्थ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
- Advertisment -

You cannot copy content of this page