2020 मधील 10 वी च्या माध्यमिक शालांत परीक्षेत लोणावळा विभागातील एकूण दहा शाळांचा 10 वी चा निकाल 100 टक्के लागला आहे. तर उर्वरित शाळांचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. त्यात लोणावळा व्ही पी एस महाविद्यालयाचा निकाल 98 टक्क्याच्या वर लागला असून 269 विद्यार्थ्यांपैकी 265 विध्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण झालेल्या प्रथम पाच विध्यार्थ्यांमध्ये 94.60 टक्के मिळवून मरगळे राजेंद्र गंगाराम हा शाळेत प्रथम तर पाटील कुमार कृष्णा हा 92.40 टक्के गुण मिळवत शाळेत दुसरा आला. कुमारी हेमाडे वैष्णवी विजय हिने 92.40 टक्के गुण मिळवून शाळेत तिसरी व दळवी ओंकार विष्णू याने 88.20 टक्के गुण मिळवत चौथा आला असून कुमारी वाळंज मोनिका संतोष ही 88.00 टक्के गुण मिळवून शाळेत पाचव्या क्रमांकावर आली असली तरी उत्तीर्ण झालेल्या सर्व विध्यार्थ्यांचे कौतुक करू तेवढे कमीच त्याचप्रमाणे त्यात मागासवर्गातील प्रथम तीन उत्कृष्ट गुण मिळविलेल्यांपैकी मरगळे राजेंद्र गंगाराम प्रथम, हेमाडे वैष्णवी विजय दुसरी तर बवधने यशराज बाळू हा तिसरा आला, त्यात हेमाडे वैष्णवी विजय ही प्रथम तीन मुलींपैकी पहिली आली, वाळंज मोनिका संतोष ही दुसरी तर जाधव पूनम धनाजी ही शाळेतील मुलींमध्ये तिसरी आली आहे.