if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
(लोणावळा प्रतिनिधी) लोणावळा : लोणावळा येथील सुप्रसिद्ध असलेल्या कुमार रिसॉर्ट येथे रंगलेल्या जुगाराचा डाव सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या पथकाने उधळून लावला.
रविवारी पहाटेच्या वेळी कुमार रिसॉर्ट येथे छापा मारून जुगार खेळत असणाऱ्या 72 जणांना ताब्यात घेतले. त्यावेळी 3 लाख 20 हजार 830 रु. रोख रक्कम व 40 लाख 75 हजार किमतीचे टोकन कॉईन जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाईत सापडलेले सर्वजण हे गुजरात राज्यातील व्यापारी असून फक्त जुगार खेळण्यासाठी इथे आले होते.
कुमार रिसॉर्टच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या हॉलमध्ये मोठया प्रमाणात जुगार सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना मिळाल्यानंतर कॉवत यांच्या सह लोणावळा शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, अश्विनी लोखंडे, पल्लवी वाघोले, विकास कदम, शंकर धनगर, ईश्वर काळे, सागर धनवे, सतीश कुदळे यांच्या पथकाने घटना स्थळावर छापा मारत ही कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईत गुजरात मधील 60 व्यापारी, सर्व्हिस देणाऱ्या 12महिलांसमवेत कुमार रिसॉर्टचे मालक धिरजलाल कुमार ऐलानी, व्यवस्थापक अन्वर शेख ( रा. मुंबई ) व झिशान इरफान इलेक्ट्रिकवाला ( वय 34, रा. जोगेश्वरी वेस्ट मुंबई )यांच्यावर भा दं वी कलम 188, 269 बरोबर दारूबंदी कायदा कलम 86 (1) जुगार प्रतिबंध अधिनियम 4 व 5 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या संदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विकास कदम यांनी फिर्याद दिली असून उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी हे पुढील तपास करत आहेत.