Tuesday, February 27, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातून 15 वर्षीय बालिका बेपत्ता, अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा संशय…

लोणावळ्यातून 15 वर्षीय बालिका बेपत्ता, अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा संशय…

लोणावळा (प्रतिनिधी): शहरातील रेल्वे विभागातून ऐका 15 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची खळबळ जनक घटना दि.1 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास लोणावळा रेल्वे स्टेशन हद्दीत घडली.
याप्रकरणी गौरी संकेत जाधव (रा.आगवाली चाळ, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादेनुसार नुसार दिनांक 1 रोजी दुपारी 4 वा.च्या सुमारास लोणावळा रेल्वे स्टेशन परिसरातून मुलगी बाथरूमला जाऊन येते असे सांगून गेली व बराच वेळ परत आली नाही म्हणून तीची आई आणि वडील यांनी सर्वत्र शोध घेतला तरीही ती सापडली नाही.म्हणून पोलिसांत फिर्याद दाखल केली असून जावेद नावाच्या व्यक्तीने तीचे अपहरण केले असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.
मुलीचे वर्णन खालील प्रमाणे आहे. वय 15 वर्षे रा. आगवाली चाळ लोणावळा ता. मावळ, जि. पुणे, जात-बौध्द, भाषा मराठी हिंदी, बांधा सडपातळ, रंग गोरा, उंची 5 फुट, चेहरा गोल, केस काळे, – नेसणीस-लाल रंगाचा टॉप व काळ्या रंगाची जीन्स, पायात पांढरे बुट असे असून सदर वर्णनाची मुलगी आढळल्यास लोणावळा शहर पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page