if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा: परिसरातील विविध शाळेतील अध्यापन करणाऱ्या गुरुजनांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.जेष्ठ नागरिक संघ लोणावळा आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात हॉटेल चंद्रलोक येथे करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. संजय पुजारी, डॉ. संदेश कदम, श्री.नंदूशेठ वाळंज, श्री.श्रीधर पुजारी, श्री.देविदास कडू आणि श्री.धीरूभाई कल्याणजी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात रिद्धी अगरवाल यांच्या नृत्याने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. श्री.राजेंद्र दिवेकर (मुख्याध्यापक लोणावळा नगरपरिषद),श्री. संजय पालवे (व्ही.पी.एस हायस्कूल), श्रीमती कौसर मनोज अग्रवाल (गुरुकुल हायस्कूल), नदिया खान (भोंडे हायस्कूल) यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कारा दरम्यान पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांच्या कार्याचे वाचन नियोजकांनी केले. शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल सर्वच उपस्थितांना कौतुक वाटले. स्वच्छता रॅली, मतदान जनजागृती रॅली, मातृदिन, शांतता दिवस, रक्षाबंधन, दीपोत्सव, दहीहंडी अशा उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.शाळेमध्ये अध्यापनाबरोबरच घेतल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, समाज प्रेम, मातृ-पितृप्रेम, बंधू प्रेम, मित्र प्रेम जागृत होते. अशा उपक्रमाची किती नितांत गरज आहे याची जाणीव सर्वांना झाली.
कार्यक्रमाचे नियोजन श्री.गोरख चौधरी (अध्यक्ष लायन् क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स), श्री. पांडुरंग तिखे (अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा), श्रीमती रश्मी शिरसवार (कार्यवाहक जेष्ठ नागरिक संघ) श्री.विजय रसाळ (खजिनदार लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स) यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगता मधून सर्वच घटकांनी देशाला महासत्ता आणि स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे आवाहन केले.तसेच उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.