if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : लोणावळा शहरातील उबाठा शिवसेना व मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांचा मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर तसेच महिला आघाडी शहर संघटिका मनीषा भांगरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश झाला.
यावेळी मनसे लोणावळा शहर सरचिटणीस निखिल सोमण, उबाठा युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, उबाठा रेल्वे मा.प्रभागप्रमुख राजूभाऊ चव्हाण, उबाठा शाखाप्रमुख प्रमोद लोहिरे, उबाठा शाखाप्रमुख संतोष दरडे, मनसे शाखाप्रमुख परेश वावळे,मा शाखाप्रमुख प्रसाद कन्नन, विवेक शिळवणे , आकाश खंडेलवाल, प्रमोद फाटे,आतिष भांगरे, दिलीप दुबे, चंद्रकांत भंडारी, सुनील निकम, राहुल कांबळे, अजय वाघमारे, ललित कदम, स्वप्नील गायकवाड, दिपाली शिरबेकर,आशाताई कदम आदी आजी माजी पदाधिकारी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती (शिंदे गट) लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर यांनी दिली.
यावेळी उपतालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख विशाल भाऊसाहेब हुलावळे, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, युवासेना उपतालुका प्रमुख नितीन देशमुख, खंडू शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते.