Friday, December 8, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात एका परप्रांतीय 20 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

लोणावळ्यात एका परप्रांतीय 20 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

लोणावळा(प्रतिनिधी): लोणावळा शहरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना दि.21 रोजी रात्री 9:00 वा. च्या. दरम्यान महाराष्ट्र बँकेच्या मागील घरात घडली.याप्रकरणी दि.22 रोजी लोणावळा शहर पोस्टे अ.म.रजि.नं 67/2023 सी.आर.पी.सी 174 दाखल करण्यात आली आहे.
नुरुद्दीन अशरफ अखोन (वय 20 वर्ष, मुळ रा.तालदिना भायासिंग,पोस्ट 24, परगाना, पश्चिम बंगाल) असे मयत युवकाचे नाव आहे.याबाबत अक्षय सुनिल गुप्ता (वय 31वर्ष धंदा-व्यवसाय सोनार रा. शुभश्री बिल्डींग भांगरवाडी लोणावळा ता. मावळ जि. पुणे) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक 21/09/2023 रोजी रात्री 09/00 वा चे दरम्यान नक्की वेळ माहीत नाही. महाराष्ट्र शेजारील माळीराम ज्वेलर्स मागील घरात नुरुद्दीन अशरफ अखोन याने घरातील मधल्या रुमच्या दरवाज्याच्या लाकडी चौकटीला, एका दोरीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.
वगैरे मजकुरावरून मयत दाखल दाखल केला असून मयताचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस हवालदार उंडे हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page