Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल…

लोणावळ्यात एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल…

लोणावळा (प्रतिनिधी) : टेबल लॅन्ड येथे रेल्वे ट्रॅक जवळ लोणावळ्यातील एका युवकावर चाकुचा हल्ला झाल्याची घटना शुक्रवार दि. 20 रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अमित सलेंदर चौरसिया (वय 28, रा. पांगोळी, लोणावळा. मूळ रा. सिहटीकर ता. खलीलाबाद जि. संतकबीर नगर राज्य उत्तर प्रदेश ) यांनी फिर्याद दिली आहे.तर याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपीवर भा.द.वी.कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी अमित चौरसिया हे टेबल लँन्ड जवळून जात असताना एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी युवकाने काही एक कारण नसताना “तुम्ही या रस्त्याने जायचे नाही”असे बोलून त्याच्या हातातील चाकू सारख्या धारदार हत्याराने फिर्यादीच्या पोटात मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीला उपचाराठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लोणावळा शहर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार म्हेत्रे पुढील तपास करत आहेत.
या परिसरात यापूर्वी वारंवार परप्रांतीयांना लुटले जाण्याच्या घटना घडत आहेत. याठिकाणी लुटले जाणारे हे परप्रांतीय असल्यामुळे ते पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देत नाही. सध्या घडलेला प्रकार हा गंभीर आहे.रात्री अपरात्री लोकल प्रवासी व महिला प्रवासी या रस्त्याने ये जा करत असतात यापुढे कोणतीही मोठी घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल देणे गरजेचे आहे. कारण या परिसरात गुन्हेगारांना पोलिसांचा काहीच धाक उरलेला दिसत नाही. याठिकाणी अशा घटना उघडकीस आल्या की पोलीस फक्त दोन तीन दिवस परिसरात गस्त घालतात आणि मग बंद होतात त्यामुळे या गुन्हेगारांचे बळ वाढत असून पोलीस याठिकाणी आपली वचक ठेवणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page