लोणावळ्यात गणेशोत्सव साजरा करताना शासनाच्या आदेशाचे व नियमांचे पालन करूया,नवनीत कॉवत…

0
275

लोणावळा दि.30: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी मार्गदर्शन सभेचे आयोजन लोणावळा शहर पोलीस स्टेशन व लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले.आज सायंकाळी पाच वाजता हॉटेल चंद्रलोक येथे ही बैठक पार पडली.


यावेळी सर्व उपस्थित गणेश मंडळांचे मार्गदर्शन करताना लोणावळा विभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव शासनाच्या आदेशाचे व नियमांचे पालन करून साजरा करूया, लोणावळा शहर हे नियम व कायदे पाळणारे शहर आहे याचा मला अभिमान आहे.

येथे सर्व धर्मीय कार्यक्रम जातीय सलोखा राखून साजरे केले जातात येणाऱ्या गणेशोत्सवानंतर शहरातील कोरोना रुग्णसंखेचा दर वाढणार नाही यासाठी आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे त्यासाठी यंदाचा गणेशोत्सवही कोरोनाचे भान ठेऊन शांततेत पार पाडूया असे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले.


यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नगरसेवक श्रीधर पुजारी, निखिल कवीश्वर, भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, विलास बडेकर, नासीर शेख, यमुनाताई साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मुजावर, विज वितरण लोणावळा विभागाचे रामगीर यांच्यासह सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, महिला दक्षता समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.