Thursday, October 31, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात घरगुती गणपती सजावटीमधून खंडू बोभाटे यांनी जनजागृतीपर देखव्याला दिले प्राधान्य...

लोणावळ्यात घरगुती गणपती सजावटीमधून खंडू बोभाटे यांनी जनजागृतीपर देखव्याला दिले प्राधान्य…

लोणावळा : लोणावळ्यातील खंडू बोभाटे यांनी घरगुती गणपती बाप्पांच्या सजावटी मधून दिले आहेत जनजागृतीचे संदेश लोणावळा नगरपरिषदेचे कर्मचारी खंडू बोभाटे यांनी आपल्या राहत्या घरी भांगरवाडी, सुमित्रा हॉल आदित्य सोसायटी याठिकाणी गणपती बाप्पा ची आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करून टाकवू वस्तूंच्या सहाय्याने घरगुती गणपतीची छानशी सजावट केली आहे. त्यामध्ये टाकवू प्लास्टिक बाटल्यांपासून झान कुंड्या तयार करून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावून छानसे गार्डन बनविण्यात आले आहे.

टाकवू पुठ्ठयापासून छानसे व आकर्षक असे एक मंदीर तयार केले असून दारात उभारलेल्या मंडपामध्ये पाणी जिरवा पाणी वाचवा असा संदेश पसरविणारी छानशी कलाकृती तयार करत पाणी कसे जिरवावे व पाणी कसे वाचवावे याचा उत्तम देखावा सादर केला आहे. त्याच बरोबर माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता कशी राखवी, घरातील ओला व सुका कचरा संकलन कसे करावे तसेच मानवी जीवनास धोका दायक असणाऱ्या टाकवू वस्तू व कचरा लाल रंगाच्या कचरा कुंडीतच टाकावा याचेही उदाहरण पटवून देणारे रंगीत फलक लावण्यात आले आहेत.

त्याचबरोब प्लास्टिक हे मानवी जीवनास अपायकारक असल्याने प्लास्टिक बॅगचा वापर करू नये या प्रमाणे आपले घर आपला परिसर स्वच्छ ठेवावा, आपले आरोग्य कसे राखावे, व झाडे लावा झाडे जगवा यासारखी जनजागृती करणारे फलकांचा वापर करून अतिशय सुंदर पद्धतीने घरगुती गणपतीची सजावट करण्यात आली आहे.

या सर्व सजावटीमध्ये खंडू बोभाटे यांच्या पूर्ण परिवाराचे योगदान असून ही सजावट पाहण्यासाठी परिसरातील व त्यांच्या कॉलनीतील रहिवाशी आणि मित्र मंडळींनी रांग लावली आहे. कोरोनाचे सर्व नियम लक्षात ठेवून व गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन लक्षात घेऊनच हा घरगुती देखावा सादर करण्यात आला आहे. खंडू बोभाटे व परिवार यांनी सादर केलेल्या देखाव्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page