Thursday, June 13, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात पठान परिवार व बाबाजान कमिटी आयोजित "छटी शरीफ" कार्यक्रमास आमदार सुनील...

लोणावळ्यात पठान परिवार व बाबाजान कमिटी आयोजित “छटी शरीफ” कार्यक्रमास आमदार सुनील शेळके यांच्या शुभेच्छा…

लोणावळा (प्रतिनिधी) : हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेर शरीफच्या 811 व्या उर्स शरीफ निमित्त लोणावळ्यातील पठान परिवार व बाबाजान कमिटीच्या वतीने ” छटी शरीफ ” चे आयोजन गुरुवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले.
पठाण परिवार आयोजित छटी शरीफ मध्ये मावळचे लोकप्रिय आमदार सुनील (अण्णा) शेळके यांनी उपस्थित राहून छटी शरीफ च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पठान परिवार आणि आमदार शेळके यांच्या हस्ते लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तर आर.पी. आय.चे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे व पठाण परिवार यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सरकार बाबाजान ग्रुप लोणावळा चे संस्थापक मुसा पठान,अध्यक्ष मिर्जा मुसा पठान,उपाध्यक्ष मन्सुर मोहम्मद मणियार,सेक्रेटरी अरबाज मुसा पठान, उपसेक्रेटरी शब्बीर सालेभाई (भोरी), कार्याध्यक्ष जिलानी रज्जाक पठान,उपकार्याध्यक्ष लतिफ मामा खान, हाजी अख्तर दीनारखेल, अब्दुला दीनारखेल,जहांगीर कोराबू, नासिर तांबोळी,शौकत बेलीम, रहीम संगे, रीयाज़ मणियार, अनीकेत देशमुख, सुमीत सदावर्ते आदी सदस्यांनी प्रसादाचे (खीर ) वाटप केले.यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
छटी शरीफ निमित्त पठान परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील विविध पक्षातील नेते व कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.सर्व उपस्थित मान्यवरांना पठान परिवार व बाबाजान कमिटी च्या वतीने शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन कादर पठान, रज्जाक पठान, अमन पठान,फीरोज़ पठान, हैदर पठान,अकरम पठान आदींनी केले तर उपस्थितांचे आभार मिर्झा पठान यांनी मानले.
यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर अध्यक्ष विलास बडेकर, कार्याध्यक्ष रवी पोटफोडे,माजी शिक्षण सभापती जितुभाई कल्याणजी, लोणावळा शहर राष्ट्रवादी महिलाध्यक्षा उमा मेहता,सईद खान (कॉन्ट्रॅक्टर),जीवन गायकवाड, युवक अध्यक्ष विनोद होगले,आरोही तळेगावकर, राजेश मेहता, काँग्रेस प्रदेश सचिव निखिल कवीश्वर,आर. पी.आय.प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मंजुश्री वाघ, प्रवक्ता फिरोज शेख, विजय जाधव, नितेश मुरलीधर जाधव यांसह अन्य मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन प्रसादाचा लाभ घेतला तसेच हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेर शरीफ च्या 811 व्या (जयंती) उर्स निमित्त छटी शरीफच्या शुभेच्छा दिल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page