Saturday, July 27, 2024
Homeक्राईमलोणावळ्यात पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक तर सहा जणांचा शोध सुरु…

लोणावळ्यात पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक तर सहा जणांचा शोध सुरु…

लोणावळा (प्रतिनिधी): बालकांसह महिलेचे अपहरण करून त्यांना मारहाण करत त्यांचेकडून घरातील काम करून घेवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोन बालकांसह एका महिलेची सुटका करून जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा पोलीसांना यश आले आहे.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लोणावळा परीसरातील कांतीनगर येथील एक टोळी हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी येणारे लोकांना मारहाण करून लुटमार करतात तसेच त्यांनी एक अल्पवयीन मुलगी व एका महिलेस पळवून आणून त्यांना मारहाण करून डांबून ठेवून त्यांचेकडून काम करून घेतात अशी बातमी मिळाली होती. मिळालेल्या बातमीचा विषय गंभीर स्वरूपाचा असल्याने सदरची बाब पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना सांगितली.
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व लोणावळा पोलीसांनी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली हनुमान टेकडी, क्रांतीनगर लोणावळा या परीसरातून गोपनीय बातमीचे आधारे इसम नामे 1) राज सिदधेश्वर शिंदे (वय 25 वर्षे, रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) आणि 2) ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे (वय 41 वर्षे, रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे ) यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता, राज शिंदे याने दि. 17/09/2023 रोजी त्याचे दोन साथीदारांचे मदतीने सहारा ब्रीज जवळ फिरण्यास आलेल्या पर्यटकांना चाकू व कुऱ्हाडीने मारहाण करत जबरदस्तीने त्यांचे कपडे, मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती. राज शिंदे याचेजवळ मिळून आलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल हा त्याच घटनेतील असल्याचे त्याने सांगितले. सदर प्रकाराबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 383/2023भा.दं.वि. का. क. 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच दि.23 / 01/2023 रोजी याच टोळीने लोणावळा सहारा ब्रीजजवळ डोंगराच्या पायथ्याला पर्यटकांना मारहाण करून लुटले असल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत लोणावळा शहर पोस्टे गुरनं 22/ 2023 भा.दं.वि.का.क.394,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
राज शिंदे व ज्ञानेश्वर लोकरे यांचेकडे बातमीचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी चालू सप्टेंबर महिन्याचे पहिल्या आठवडयात एका महिलेस लोणावळा स्टेशनचे बाहेरील परीसरातून चाकूचा धाक दाखवून पळवून नेले आणि राहते घरी नेवून कोंडून ठेवले, तिच्या कडील मोबाईल व रोख रक्कम तिला मारहाण करून काढून घेतली व तिचेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची माहिती सांगितली. सदर महिलेस राज शिंदे याचे राहते घरातून सुटका करण्यात आली असून.तिचा चोरी केलेला मोबाईल देखील मिळून आला आहे. सदर पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोस्टे गु.र.नं. 410/2023 भा.दं.वि.का.क.376 (ड),376 (2) (एन),394,344, 363,324,323,504, 506,34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पिडीत महिलेची सुटका करतेवेळी त्या ठिकाणी आणखी दोन बालके (अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा) मिळून आल्याने त्यांना विश्वासात घेवून त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करून विचारपूस केली असता, दि.9/9/2023 रोजी राज शिंदे, त्याची पत्नी करीना ऊर्फ माही राज शिंदे यांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने लोणावळा स्टेशनचे बाहेरील परीसरातून मोटार सायकलवर जबरदस्तीने बसविले व पळवून आणून घरात साखळीने बांधून डांबून ठेवले. तिला उपाशी ठेवून घरातील काम करायला लावून हाताने, सळईने मारहाण केली तसेच तिचेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले असून अल्पवयीन मुलास मारहाण करून त्यासही डांबून ठेवून त्याचेकडून देखील कामे करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीचे कुटुंबाशी संपर्क करून तिचे आईने लोणावळा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.409/2023 भा.दं.वि.का.क.376 (ड),376 (2) (एन),394,344, 363,324,323,504, 506,34 पोक्सो अॅक्ट कलम 4,6,8,10,12 सह अल्पवयीन न्याय कायदा कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण दहा जणांचे टोळीमध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालक, तीन महिला,पाच पुरूष असून त्यांचेपैकी दोन पुरूष आरोपींना अटक करणेत आलेली आहे. तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना येरवडा पुणे येथील बाल निरीक्षण गृह येथे ठेवण्यात आले आहे. इतर सहा आरोपींचा शोध चालू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,पोसई प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, सफौ प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पोहवा अतुल डेरे, राजू मोमीण, दिपक साबळे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, दता तांबे, पोना संदिप वारे, तुषार भोईटे, बाळासाहेब खडके, पोकॉ मंगेश भगत, अक्षय नवले, प्राण येवले, निलेश सुपेकर, चासफौ काशिनाथ राजापूरे तसेच लोणावळा शहर पोस्टेचे पोनि सिताराम डुबल, सपोनि सुनील पवार, पोसई लतिफ मुजावर, पोहवा जयराज पाटणकर, पोना हनुमंत शिंदे, अजिज मिस्त्री, पोकॉ भुषण कुवर, विरसेन गायकवाड, लोणावळा ग्रामीण पोस्टे चे सपोनि कारंडे, पोहवा कवडे,विजय मुंडे, पोना गणेश होळकर, खैरे, कदम, पंडीत, तुरे, गवळी, मपोहवा आश्विनी शेंडगे, मपोकॉ रिया राणे, यांनी केली असून पिडीत महिला व अल्पवयीन मुलीचे गुन्हयाचा तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page