लोणावळा : शहरातील महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी उपाय योजना म्हणून IRB कंपनीने गवळी वाडा येथील रस्त्यावर रस्ते दुभाजक लावण्यास सुरुवात केली आहे.
लोणावळ्यातील नागरिक व समस्त लोणावळेकरांनी IRB कंपनीच्या विरोधात मागील महिन्यात रास्ता रोको आंदोलन केले होते.त्यात केलेल्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तिर्व आंदोलनाचा इशारा लोणावळ्यातील जागरूक नागरिकांनी दिला होता.
त्यांनतर IRB कंपनीकडून मनशक्ती केंद्र वरसोली ते लोणावळा दरम्यान फक्त पांढरे पट्टे महामार्गावर रेखाटण्यात येत होते. परंतु आज अखेर IRB कंपनीला जाग आली असून रस्त्यावर दुभाजक लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
वरसोली ते लोणावळा खंडाळा दरम्यान दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर दरम्यान महामार्गावर पथदिवे लावण्यासाठी तीन ते चार दिवसांत एनओसी येणार आहे तर पाच जागी स्पीड ब्रेकर लावण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे . रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव देखील तयार झाला असून पुढच्या आठवड्यामध्ये तो मुंबईला पाठवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.