Friday, February 23, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात राज्यपाल कोश्यारी यांचा महाविकास आघाडी कडून निषेध…

लोणावळ्यात राज्यपाल कोश्यारी यांचा महाविकास आघाडी कडून निषेध…

लोणावळा (प्रतिनिधी): राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा लोणावळ्यात महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला.आज रविवार दि.20 रोजी सकाळी 12 वा.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा निषेध नोंदविण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे एका कार्यक्रमात बोलत असताना “छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श”तर नितीन गडकरी हे वर्तमान काळातील आदर्श ” असे वादग्रस्त विधान केले.या वादग्रस्त वक्ताव्याने नव्या वादाला फोडणी लागली असून.
संपूर्ण देशाचे अराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. असे असताना कोश्यारी यांनी महाराजांची तुलना ही नितीन गडकरी यांच्याशी केल्याने देशभरात नवीन वादाला उधाण आले आहे.कोश्यारी यांच्या निषेधार्थ लोणावळ्यातून महाविकास आघाडी एकवटली असून आज काळे झेंडे घेऊन. कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी शिवसेना लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक,शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे,जयवंत दळवी, संजय भोईर, कमर अन्सारी, ज्ञानदेव आखाडे, मंगेश येवले,राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, महिला शहराध्यक्षा उमा मेहता, युवक अध्यक्ष आदित्य पंचमुख,फिरोज शेख, राजू बोराटी, राजेश मेहता तसेच काँग्रेस आय चे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर,मंगेश बालगुडे, मनिष गवळी, संध्या खंडेलवाल, युवक अध्यक्ष दत्तात्रय दळवी, जितेंद्र कल्याणजी, बाबुभाई शेख आदींसह शहरातील महाविकास आघाडीचे सर्व महिला व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page