Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात शासनाचे नियम डावलणाऱ्या 12 जणांविरोधात गुन्हे दाखल...

लोणावळ्यात शासनाचे नियम डावलणाऱ्या 12 जणांविरोधात गुन्हे दाखल…

लोणावळा दि.8: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बारा जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

अत्यावशक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिलेले असताना शहरातील दुकानदार भाविन महेंद्र कपाडिया, अमोल वासुदेव मुंजे, सलवारज नाडार, धनराज चुन्नीलाल ओसवाल,खोजेमा सैफुद्दीन रामपुरवाला, मनिष शिवरतन अगरवाल, सुबीर चक्रवर्ती व चेतनकुमार गोकुळचंद जैन या आठ दुकानदारांनी दुकाने सुरु ठेवत विना मास्क व शारीरिक अंतरचे नियम न पाळल्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

तर भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळा शहर भाजपा ने महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते त्यानुसार शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, शुभम मानकामे, श्रवण चिकणे, विजय सकट या चोघे असे 12 जणांविरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम 188,269 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -