Friday, November 22, 2024
Homeक्राईमलोणावळ्यात शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची गोळ्या घालून ,हत्या , तर...

लोणावळ्यात शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची गोळ्या घालून ,हत्या , तर 24 तासात दोन खून लोणावळा शहर हादरले…

लोणावळा शिवसेना माजी शहर प्रमुख राहुल शेट्टी हे आज सकाळी त्यांच्या घराखाली असलेल्या येवले चहाच्या स्टॉलवर चहा पिताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर मारेकर्‍यांनी तीन गोळ्या घातल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यांच्या डोक्यात दोन व छातीत गोळी लागली असून, मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुल शेट्टी यांना तत्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. लोणावळ्यातील जयचंद चौकात ही घटना घडल्याने लोणावळा शहर संपूर्णपणे हादरले आहे. ३० ते ३५ वर्षांपूर्वी राहुल शेट्टी यांचे वडील उमेश शेट्टी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज राहुल यांची निर्घृण हत्या झाली.
राहुल यांच्या पश्चात शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौम्या शेट्टी, आई मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्या मार्गाने मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. राहुल यांना आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचे संकेत मिळाल्यावर राहुल शेट्टी यांनी यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली होती.

त्याचप्रमाणे पहिली घटना रविवारी दसऱ्याच्या रात्री दहाच्या सुमारास लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे घडली. या घटनेत गणेश नायडू या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असून, या घटनेत खुनी हल्ला करणाराही गंभीर जखमी झाला आहे.

त्यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये विजय गणेश नायडू ( वय 17, रा. बापू पाटील चाळ, तुंगार्ली, लोणावळा ) याने फिर्याद दिली असून गु. र. नं. 485/2020 भा. द. वी. कलम 302, 34 प्रमाणे लोणावळा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी 1) मोबीन अब्दुलगनी बेबल ( वय, 38, रा. क्रांतीनगर, लोणावळा व 2) शंकर शिर्के ( रा. कार्ला, ता. मावळ, जि. पुणे ) यांनी मयत गणेश नायडू ( वय 44, रा. क्रांतीनगर, लोणावळा याला दि. 25, रोजी रात्री 9 वा. सुमारास मित्र मंडळ चौक हनुमान टेकडी, लोणावळा येथे चौकात उभा असताना हाताने, लाथाबुक्याने, लोखंडी रॉड व चॉपरने गंभीर मारहाण केल्याने गंभीर जखमी होऊन गणेश नायडू ह्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.दोन्ही घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page