
लोणावळा दि. 24: श्रावण निमित्त श्रावण महोत्सव हॉटेल चंद्रलोक येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन शैला कांक्रिया यांनी केले असून लोणावळ्यातील अनेक महिलांनी यात सहभाग नोंदविला होता.
सदर श्रावण महोत्सवामध्ये महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात महिलांना ग्रीन थिम देऊन खेळ ठेवण्यात आले प्रमुख पाहुणे व जज म्हणून श्वेता वर्तक आणि श्रावणी कामत यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी नंदू व रुबी सिंग यांनी केले.
कार्यक्रमाच्या अखेरे पहिले बक्षीस सौ. स्नेहल अंबोरे यांना देण्यात आले कार्यक्रमाची रूपरेषा व सहयोग आशा खिल्लारे, स्वप्ना ढाकोळ यांनी केले.यावेळी पुष्पा भोकसे अश्विनी जगदाळे, पंचम, जया,लोणावळा शहर पत्रकार संघांचे अध्यक्ष ऍड. संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.