लोणावळा : (श्रावणी कामत) लोणावळा येथील ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता दहावी नंतर विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणी व पुढील प्रवेशाबाबत असलेली द्विधा मनस्थिती याबाबत या मेळाव्यात तज्ञांकडून विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नव्यानेच इयत्ता ११वीचे विज्ञान, वाणिज्य व कला वर्गांची सुरूवात करण्यात येत आहे. तसेच, JEE, NEET, CET, MPSC, UPSC अशा विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देण्यासाठी अनुभवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव सौ. राधिका भोंडे यांनी सांगितले. लोणावळा व परिसरातील विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा व स्पर्धा परीक्षांसाठी पुणे मुंबई या मोठ्या शहरात जावे लागत असल्यामुळे वेळ आणि पैसा वाया जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून संस्थेचे अध्यक्ष ॲड माधवराव भोंडे व संचालक मंडळाने लोणावळा शहरात कनिष्ठ विद्यालयासह मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. १० जून पासून प्रवेश परीक्षांचे ब्रिज कोर्सेस सुरू करण्यात येणार असून, दि. १८ जून पासून इयत्ता ११वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
प्राध्यापक योगेश चोरगे, प्राध्यापक संदीप गवळी, प्राध्यापक सुशांत सावंत, प्राध्यापक राकेश गुरव यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना विविध परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या सचिव सौ. राधिका भोंडे, संचालक मिलिंद खळदकर, संजीव खळदकर, संजीव वीर, डॉ. संजय पुजारी, माध्यामिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते, पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजूम शेख, माध्यामिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले, प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे, पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक, शशिकला तिकोणे यांसह विद्यार्थी पालक व शिक्षक उपस्थित होते.