![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरू असून त्यांच्या पथकाने लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटख्याची साठवणूक करणाऱ्या दोन जणांवर धडक कारवाई करत सुमारे एक लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.गुरुवार (दि.22) रोजी ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री करिता साठवणूक करण्यात आली आहे. त्यावरून सहा. पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी गुरुवार त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले.त्याठिकाणी पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत मौजे औंढे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे मच्छिंद्र किसन घनवट (वय 32 वर्ष) याच्या मालकीच्या खोलीमधून व लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत धवल रमेश लुनावत याच्या मालकीचे लूनावत होलसेल स्टोअर्स मधून महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे एक लाख दोन हजार दोनशे नऊ रूपये एवढ्या किमतीचा गुटखा जप्त केला. नमूद दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरबाबत अनुक्रमे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 328 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पो.हवा अंकुश नायकुडे, पो. हवा बंटी कवडे, म. पो .हवा. आशा कवठेकर , पो.कॉ सुभाष शिंदे , पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.