Thursday, June 1, 2023
Homeपुणेमावळलोहगडावरील हाजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरुसाच्या दिवशी परिसरात कलम 144 चे...

लोहगडावरील हाजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरुसाच्या दिवशी परिसरात कलम 144 चे निर्बंध..

लोणावळा (प्रतिनिधी): लोहगड व घेरेवाडी परिसरात दि.5/1/2023 ते 8/1/2023 दरम्यान फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.याबाबतचे उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी संदेश शिर्के यांनी दि.4 रोजी आदेश निर्गमीत केले आहेत.

लोहगड किल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याचा उरूस दि.6 जानेवारी ते 7 जानेवारी रोजी साजरा करणेसाठी मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहत असतो.तसेच लोहगडावरील दि.6/1/2023 रोजीचा उरूस साजरा होवू नये यासाठी त्यास प्रखर विरोध दर्शवण्यासाठी मावळ तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायत/नगरपालीका / नगरपंचायत यांचे बजरंगदल व इतर संघटनांच्या भूमिकेस पाठिंबा असलेबाबत लेखी समर्थन पत्र प्राप्त करून त्याबाबतचे निवेदन दि.2 रोजी तहसिलदार मावळ यांना दिले आहे.

सदर निवेदनात व समक्ष चर्चेत त्यांनी लोहगडावरील दर्गा व मजारी यांचा कोणताही ऐतिहासीक पुरावा नसल्याने मा न्यायालयाचे आदेशानुसार प्रतापगडावरील अनाधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले आहे त्या प्रमाणे लोहगडावरील अनाधिकृत बांधकाम काढावे, हि बांधकामे अधिकृत करण्यासाठी उरूसाचा वापर केला जात आहे. त्यामुळे लोहगडावर उरूस होवू दिला जाणार नाही. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत हा अनाधिकृत उरूस होवू देणार नाही या प्रसंगी मोठे जनआंदोलन / मोर्चा उभारू असेही सांगण्यात आले आहे.

उरूसाला विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. भारतीय पुरातन विभाग पुणे यांनी देखील लोहगडावर दर्ग्याचे उरूसास परवानगी नाकारली असून त्या दरम्यान पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

लोहगडावरील दर्ग्याचे उरूसाचे दरम्यान हिंदू मुस्लिम समाजाचे लोक मोठया प्रमाणात लोहगडाचे परिसरामध्ये येण्याची शक्यता असल्याने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून दि.5/1/2023 ते 8/1/2023 रोजीच्या दरम्यान लोहगड व घेरेवाडी या परिसरात फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

लोहगड व घेरवाडी परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी दि. 5 चे 00:00 वा. पासून ते दि. 8 चे 6:00 वाजेपर्यंत खालील बाबी करण्यास प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

1) कोणीतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक व इतर समाजमाध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहीती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही, असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती तसेच ग्रुप अॅडमिनची राहील.

2) लोहगड व घेरेवाडी हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाच्या लेखी परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डींग लावण्यास प्रतिबंध राहील.

3) सदर परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीनी जमा होवू नये.

4) समाज भावना भडकवतील अशा घोषणा अथवा भाषण करू नये.

5) सदर परिसरामध्ये मोर्चा/ आंदोलन करण्यात येवू नये.

6) प्रतिबंधात्मक कालावधी दरम्यान धार्मिक विधीसाठी पशु पक्षांचा बळी दिला जावू नये.

7) सदर परिसरामधील ऐतिहासीक व सार्वजनिक वास्तुंचे नुकसान करण्यात येवू नये.

वरील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.वि.सं.कलम 188 मधील तरतुदी व प्रचलित कायदयान्वये शिक्षेस पात्र राहील.

You cannot copy content of this page