लोहगडावर शिव राज्याभिषेक दिन उत्सहात साजरा,शिरीष महाराज मोरे यांच्या हस्ते शिव स्मारकाचे पूजन !

0
20

मळवली : रविवार दि .12 जून रोजी लोहगड येथील शिवस्मारकावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला . श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने शिवस्मारकावर सुंदर सजावट करण्यात आली होती . शिवस्मारक पूजन व अभिषेक जगद्गुरू संत तुकोबारायांचे 11 वे वंशज व शिवशंभू विचार मंच प . महाराष्ट्र प्रांत संयोजक ह.भ.प. शिरिष महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ग्रामपुरोहित प्रभाकर दिघे गुरुजींनी मंत्रोच्चाराने शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक संपन्न केला.

ह.भ.प. मोरे महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की , आदिलशाही , निजामशाही , मुघलशाही अशा स्वराज्यावरील चौफेर आक्रमणाविरुद्ध शिवाजी महाराजांनी सह्याद्रीमधील मावळ्यांना सोबत घेत लढा देऊन देव , देश व धर्माचे संरक्षण केले . ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला व हिंदू पद पादशाहीची स्थापना झाली . शिवाजी महाराजांच्या रूपाने सार्वभौम हिंदू राजा म्हणून लाभला . हा दिवस म्हणजेच “ हिंदूसाम्राज्य दिन ” होय ! हा सुवर्णक्षण साजरा करण्यासाठी रमेश बैकर , शंकर चिव्हे , राजू शेळके , पोपट दिघे आदी लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मोरे महाराजांचा सन्मान गणेश धानिवले ( चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी ) , सचिन गोरडे ( पोलीस पाटील ) , गणपत ढाकोळ ( उपसरपंच ) आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . ध्येय मंत्र प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक सचिन टेकवडे , मार्गदर्शक संदीप गाडे , अध्यक्ष विश्वास सागर कुंभार , अनिकेत दौंडकर , कार्याध्यक्ष आंबेकर , अमोल गोरे , बसप्पा भंडारी , अमोल मोरे , राहुल वाघमारे , महेंद्र बैकर , सोमनाथ बैकर आदी कार्यकर्त्यांनी केले होते.