Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळालो.न.पा. महिला बालकल्याण विभाग व मिरा महिला बहुउद्देशीय सेवा भावी संस्था आयोजित...

लो.न.पा. महिला बालकल्याण विभाग व मिरा महिला बहुउद्देशीय सेवा भावी संस्था आयोजित कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न..

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा नगरपरिषद महिला बालकल्याण विभाग आणि मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ दि. 12 जून रोजी लोणावळा नगरपरिषद कार्यालयात संपन्न झाला.
लोणावळा नगरपरिषद महिला बालकल्याण विभाग आणि मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये ब्युटी पार्लर, मेहंदी नक्षीकाम, कापडी पिशवी शिवणकाम, केक, आईस्क्रीम,अगरबत्ती, जेली चॉकलेट, जाम अशी प्रशिक्षणे देण्यात आली.
सदरील प्रशिक्षणे एक महिना कालावधीसाठी घेण्यात आली.
लोणावळा शहरांमधील गरजू व गरीब महिलांसाठी सदरील प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली होती. ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आणि 270 महिलांना सदरील प्रशिक्षण देण्यात आले.सदर कौशल्य प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम नगरपरिषद सभागृहाच्या चौथ्या मजल्यावर संपन्न झाला.
प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास उपमुख्याधिकारी पांढरपट्टे ,
महिला बालकल्याण विभागाच्या सौ.सुनीता जाधव, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप गायकवाड यांनी केले तर आभार मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष रेश्मा शेख यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा बुटाला यांनी केले .कार्यक्रमास शहरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

मुख्याधिकारी व प्रशासक पंडित पाटील यांचे मार्गदर्शन सूचना व आदेशानुसार सदरील प्रशिक्षणे संपन्न झाली.
- Advertisment -

You cannot copy content of this page