
लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा नगरपरिषद ऊर्दू माध्यमिक विद्यालय,वार्षिक स्नेहसंमेलन 2022-23 व पारितोषिक वितरण समारंभ बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एजाज अहमद यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्सहात संपन्न झाला.
आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक एजाज अहमद लाभले तर अध्यक्ष स्थानी सुन्नी मुस्लिम मिनारा मस्जिद ट्रस्टचे व्हाईस चेअरमन हाजी रफीक शेख हे होते. यावेळी बाबुभाई शेख, सईद खान, सर्फराज शेख, बाळकृष्ण बलकवडे (सर), सातदिवे (सर), हबीब नदाफ (सर), रेहान सय्यद, रेश्मा शेख, मन्यार, मौलाना चाँद खान, मौलाना मोहम्मद काझीम, मौलाना नुर आलम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक सईद सर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना पुष्प गुच्छ देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये विध्यार्थ्यांनी नृत्य व प्रात्यक्षीके सादर करून पाहुण्यांची मन जिंकली तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय क्रीडा स्पर्धेतील बक्षीसांचे वितरण करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका रोशनआरा शेख व शबाना रमजान शेख यांनी विशेष परिश्रम घेत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून उद्योजक जिशान हनीफ शेख यांनी कार्यक्रमासाठीच्या मंडप, डेकोरेशन व साउंड सिस्टमचे सहकार्य केले तर सईद खान यांच्यावतीने सर्व विध्यार्थ्यांना नाश्ता व शाळेसाठी कायम स्वरूपी सहा सतरंजी भेट देण्यात आल्या.यावेळी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मनन्यात आले.
सदर कार्यक्रमात लोणावळा शहरातील आजी-माजी विध्यार्थी, पालक वर्ग, सर्व बक्षिसदाते आणि लो.न.पा.उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.