वंचित बहुजन आघाडीच्या उध्या होणाऱ्या आंदोलनामुळे सरकारचे धाबे दणाणले..

0
69

दि.३०/०८/२०२०
अष्ट दिशा वृत्तसेवा, प्रतिनिधी, संतोष पवार,
उध्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे वंचित बहुजन आघाडीचे. राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोना च्या नावाखाली विनाकारण सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवले आहेत आहेत असा वंचित बहुजन आघाडीचा सरकारवर आरोप आहे.

परंतु या उलट सरकारने पंढरपूरमध्ये वारकऱ्यांनी एकत्र येऊ नये म्हणून जय्यत तयारी केली आहे. पंढरपूर कडे जाणारी एसटी सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे. तसेच विठ्ठल मंदिर परिसरात लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. कोणीही मंदिरात प्रवेश करू नये यामुळे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरासह संपूर्ण पंढरपुरात पोलिसांचा ताफा मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे.


राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मागणीसाठी. खूप मोठ्या भाविकांसह उद्या सोमवारी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात वंचित बहुजन आघाडीने प्रवेश करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. उद्याच्या तयारीवरुन असे लक्षात येत आहे की.सरकारने या आंदोलनाचा खूप मोठ्या प्रमाणात धसका घेतलेला आहे.