Sunday, April 21, 2024
Homeपुणेवडगाववडगांव नगरपंचायतीत जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन स्वच्छता शपथ घेऊन साजरा…

वडगांव नगरपंचायतीत जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन स्वच्छता शपथ घेऊन साजरा…

मावळ (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त आज 1 मे कामगार दिनानिमित्त वडगाव नगरपंचायत आवारात लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून महाराष्ट्र दिन उत्सहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र दिन साजरा करताना शहरातील स्वच्छता राखण्यासंदर्भात सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली तसेच नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आतंरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page