Sunday, June 23, 2024
Homeपुणेवडगाववडगांव नगरपंचायत आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत संपन्न झाली…

वडगांव नगरपंचायत आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत संपन्न झाली…

वडगांव (प्रतिनिधी):मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वडगाव नगरपंचायतीची आढावा बैठक संपन्न झाली. शहरामधील विविध भागात सद्यस्थितीत सुरू असलेली विकासकामे तसेच प्रलंबित असलेली विकासकामे आणि वडगाव नगरपंचायत प्रशासकीय इमारतीची पाहणी करताना इतर कामकाजांचा आढावा आमदार सुनिल शेळके यांनी घेतला.
तसेच वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीतील मुख्य रस्त्याचे कामासंदर्भात पीडब्ल्यूडी अधिकारी, वडगाव नगरपंचायत अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत मुख्य रस्त्याचे कामास दोन ते तीन दिवसांत सुरुवात करण्याच्या सूचना संबधीत अधिकार्‍यांना देण्यात आल्या.आज वडगाव शहरांमधील वेगवेगळ्या भागात विविध विकासकामे अतिशय प्रगतीपथावर सुरू आहेत. तर ठिकाणांचा अपवाद वगळता थोड्याफार परिसरातील व्यक्तींच्या परस्पर जागेच्या अभावी ठराविक विकासकामे रेगांळली आहेत, अशी विकासकामे संबधीत व्यक्तीशी चर्चा विनिमय करून ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी संबंधित कामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त नगरपंचायत पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचारी यांनी जागृत राहून पाण्याच्या पाईप लाईन संबंधित काही किरकोळ दुरूस्ती असतील त्या त्वरीत दुरूस्त करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना येणाऱ्या कालावधीत शहरवासीयांठी कार्यान्वित होणार आहे.
यावेळी वडगाव शहराला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळके यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, मुख्याधिकारी विजय सरनाईक, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, गणेश म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण, शारदा ढोरे, पुनम जाधव, पुजा वहिले, प्रमिला बाफना, सायली म्हाळसकर आणि नगरपंचायत अधिकारी उपस्थित होते.येणाऱ्या कालावधीत वडगाव शहरातील विकासकामांसाठी अजून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी दिले.
- Advertisment -

You cannot copy content of this page