Friday, June 14, 2024
Homeपुणेवडगाववडगांव मावळ पहिल्यांदाच पतंग मोहोत्सवाला पतंगप्रेमिंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…

वडगांव मावळ पहिल्यांदाच पतंग मोहोत्सवाला पतंगप्रेमिंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…

मावळ (प्रतिनिधी): मोरया प्रतिष्ठानच्या वतीने नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून नववर्षानिमित्त 1 जानेवारी 2023 रोजी वडगाव शहर मर्यादित भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या पतंग महोत्सवात शहरातील लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सुमारे 650 ते 700 पतंग प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पतंग प्रेमींना मोरया प्रतिष्ठानच्या वतीने नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत पतंग आणि दोऱ्याचे रीळ विनामूल्य वाटप करण्यात आले. यात लहान मुले-मुली, युवक तसेच पालकांनी मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद लुटला.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, वडगाव शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अतुल वायकर, पुणे काईट्स चे प्रमुख रमेश पारते, श्रीकांत चेपे, ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, उद्योजक सचिन कडू, मंगेश खैरे, अमोल बाफना, सोमनाथ धोंगडे तसेच मोरया महिला प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका, मोरया प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि शहरातील लहान मुले-मुली, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पतंग महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रकारचे पतंग उडवण्याची तसेच पाहण्याची सुवर्णसंधी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला लहान मुलांना तसेच पालकांना अनुभवायला मिळाली. यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page