Saturday, September 21, 2024
Homeपुणेमावळवडगांव येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचा उदघाटन समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संपन्न…

वडगांव येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचा उदघाटन समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संपन्न…

मावळ (प्रतिनिधी):वडगांव येथील पुणे-मुंबई हायवे महामार्गालगत नव्याने सुरु होत असलेल्या ‘विघ्नहर्ता हॉस्पिटल’ चा उदघाटन शुभारंभ मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या शुभहस्ते नगराध्यक्ष मयूर ढोरे, डॉ विकास जाधावर, सामाजिक कार्यकर्ते गोरख जाधावर, सुरेखा जाधावर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी वडगाव शहरातील सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी डॉ विकास जाधावर आणि डॉ स्मिता पालवे-जाधावर यांना शुभेच्छा दिल्या.
वडगाव नगरपंचायत हद्दीतील पुणे मुंबई महामार्गावरील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभाग, एक्स-रे सुविधा, सुसज्ज आँपरेशन थिएटर, पॅथाॅलाॅजी लॅब अशा विविध आद्यय्यावत सुविधांनी सज्ज आहे. वडगाव मावळ व परिसरातील नागरिकांना या हॉस्पिटलच्या उत्तम रुग्णसेवेचा नक्कीच फायदा होणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, विशाल वहिले, नगरसेविका पुनम जाधव, माया चव्हाण, पुजा वहिले, सायली म्हाळसकर, अजय भवार आदी उपस्थित होते.
कोरोना काळात वडगाव शहरातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात डॉ विकास जाधावर यांचे खूप मोठे योगदान आहे. अशी प्रशंसा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केली.
पुढील कालावधीत वडगाव शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विघ्नहर्ता हॉस्पिटल सदैव तत्पर असेल अशी अपेक्षा आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page