Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळवडगांव रेल्वे स्टेशन हद्दीत मालगाडीच्या धडकेने 20 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू…

वडगांव रेल्वे स्टेशन हद्दीत मालगाडीच्या धडकेने 20 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू…

मावळ (प्रतिनिधी): धावत्या रेल्वे मालगाडीच्या धडकेने एका विस वर्षीय अज्ञात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 1 वाजण्यापूर्वी वडगांव रेल्वे स्टेशन हद्दीत रेल्वे किलो मिटर नं.153/33-35 अप लाईनजवळ घडली.
पुणे लोहमार्ग पोलीस एस. ई. सावंत यांनी दिलेल्या माहिती नुसार मयत इसम हा अनोळखी असून वय अंदाजे 20 वर्षे आहे.धावत्या मालगाडी च्या धडकेने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असून मयताचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे – अंगाने मध्यम, रंग सावळा, दात सफेद, कान मध्यम, कपाळ मोठे, मिशी काळी व बारीक,चेहरा उभट, ओठ मध्यम, डोळे काळे, नाक सरळ, दाढी काळी व बारीक, डोक्यावरचे केस काळे वाढलेले आणि उंची 5 फूट 3 इंच इतकी आहे, तर मयताच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फुल बाह्याचा टी शर्ट व पांढऱ्या रंगाची जीन्स असे परिधान केलेले असून अपघातामध्ये पूर्ण कपडे फाटलेले आहेत.
सदर मयत इसम आपल्या परिसरातील असल्यास पुणे लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page