Thursday, June 13, 2024
Homeपुणेमावळवडगांव शहरातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ…

वडगांव शहरातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ…

मावळ (प्रतिनिधी): मोरया महिला प्रतिष्ठानच्या सहकार्याने राजर्षी शाहू स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनेतंर्गत वडगाव शहरातील विशेष घटक व सर्वसाधारण प्रवर्गातील युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, मिटकाॅन फोरम चे संचालक गणेश खामगल, कॉर्डिनेटर पल्लवी कांबळे, प्रशिक्षक नयना भोसले, कार्याध्यक्षा चेतना ढोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी या उद्योजकता विकास प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना मोरया महिला प्रतिष्ठानच्या प्रसिद्धीप्रमुख नयना भोसले या पार्लर कोर्सचे मोफत प्रशिक्षण देणार आहेत.
या प्रशिक्षणामुळे शहरातील युवतींना भविष्यात स्वत:च्या स्वयंरोजगारासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे फायदा होणार असून त्या आपल्या पायावर उभ्या राहून आर्थिक स्वावलंबी बनतील अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केली.
सदरचे पार्लर कोर्स प्रशिक्षण एक महिनाभर मोफत असून त्यानंतर यात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रत्येकी एक हजार रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र चे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, मिटकॉन फोरम कॉर्डिनेटर पल्लवी कांबळे यांनी दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page