वडगावकरांना पडणार मायरा सायकल अँड टॉईजची भुरळ.. वडगावमध्ये प्रशस्त दालनाचे उदघाट्न !

0
28

वडगाव मावळ : गुढीपाडवा व हिंदू नववार्षच्या शुभ मुहूर्तावर तसेच आई-वडिलांच्या कृपा आशीर्वादाने वडगाव मधील युवा उद्योजक दीपेश तानाजी ढोरे व भूषण तानाजी ढोरे या दोन सख्या बंधूंच्या मायरा सायकल अँड टॉईज या व्यवसायाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले.

सध्याच्या युगात मनुष्य जातीची होणारी धावपळ आणि दगदगीचे जीवन लक्षात घेऊन स्वतःला तंदुरुस्त व निरोगी ठेवण्यासाठी तसेच वाढत चालेली पेट्रोल-डिझेल महागाई व त्यावरील खर्चाची बचत करण्यासाठी सर्वसामान्य जनता पुन्हा हळू-हळून सायकलचा पर्याय स्वीकारू लागली असताना याची अचूक वेळ साधत या ढोरे बंधूंनी वडगाव शहरात प्रथमच मायरा सायकल अँड टॉईज या आपल्या नूतन व्यवसायाची सुरुवात केली असून याचा उद्घाटन समारंभ गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पार पडला याप्रसंगी दोन्ही बंधूंना शुभेच्छा व सदिच्छा देण्यासाठी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ म्हाळसकर, पुणे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष मयूर ढोरे,नायब तहसीलदार सुनंदा भोसले,तुकाराम बुवा ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे,मनोज ढोरे यांसमवेत ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.