वडगाव नगरपंचायतमध्ये सहा घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला….

0
59
वडगाव दि.30: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व वडगाव नगरपंचायत विशेष फंडातून शहरातील कचरा संकलन करण्यासाठी सहा चारचाकी घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या.

आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत या घंटागाडी वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी सभापती बाबुराव आप्पा वायकर,काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मंगेशकाका ढोरे, तुकाराम उर्फ बुवा ढोरे, बारकुदादा ढोरे, गंगाराम ढोरे, चंदुकाका ढोरे, सुरेश कुडे, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे,
उपनगराध्यक्ष प्रमिला बाफना, नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, सुनिल ढोरे, किरण म्हाळस्कर, दिलीप म्हाळस्कर, दिनेश ढोरे, शारदा ढोरे, पुनम जाधव, पुजा वहिले, खंडुजी भिलारे,शरद ढोरे, खंडेराव जाधव, राजेश बाफना, प्रविण ढोरे, अतुल राऊत, सोमनाथ धोंगडे आणि सर्व नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी,आणि कर्मचारी उपस्थित होते.