वडगाव नगरपंचायत हद्दीत 90 लाखांच्या स्ट्रीट लाईट पोल उभारणीच्या कामाला प्रारंभ…

0
141

वडगाव दि.25: आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत वडगाव नगरपंचायत कडून नगराध्यक्ष मयूरजी ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने वडगाव नगरपंचायत हद्दीतील सात प्रभागांमधील पथ दिवे उभारणीला प्रारंभ.

वडगाव नगरपंचायतितील प्रथमता सात नियोजित प्रभागांमधील सर्व परिसरात पहिल्या टप्प्यात ९० लाख रुपये इतक्या किमतीचे स्ट्रीट लाईट्स पोल उभारण्याच्या कामास नगरसेवक राजेंद्रजी कुडे, नगरसेविका मायाताई चव्हाण यांच्या प्रभागापासून युद्धपातळीवर सुरूवात करण्यात आली आहे. लवकरच संबंधित प्रभागांत पथदिवे उभारणीची विकासकामे मार्गी लागतील.


प्रथम नियोजित सात प्रभाग पुढील प्रमाणे….
१) प्रभाग क्रमांक ३ • ११ लक्ष ४६ हजार रूपये
२) प्रभाग क्रमांक ४ • १४ लक्ष ४३ हजार रूपये
३) प्रभाग क्रमांक ५ • १० लक्ष ७४ हजार रूपये
४) प्रभाग क्रमांक ६ • १२ लक्ष ९१ हजार रूपये
५) प्रभाग क्रमांक ८ • ९ लक्ष ४७ हजार रुपये
६) प्रभाग क्रमांक १० • १२ लक्ष १२ हजार रूपये
७) प्रभाग क्रमांक १५ • १८ लक्ष ९ हजार रूपये

वरील सात प्रभागातील सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित प्रभागात पुढील कालावधीत स्ट्रीट लाईट्सचे पोल उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली आहे.