वडगाव नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चातून नगरवासियांना एक हजार वृक्षांचे मोफत वाटप.

0
90

मावळ दि.4:वडगाव शहरातील नागरिकांना नगराध्यक्ष मयूर दादा ढोरे यांच्या स्वखर्चातून मोफत एक हजार वृक्षांच्या वाटपाचा शुभारंभ मावळचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.


यावेळी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव आप्पा वायकर, मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जेष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, अशोकराव बाफना, तज्ञ संचालक सुभाषराव जाधव, मा उपसरपंच तुकाराम उर्फ बुवा ढोरे, वडगाव काॅगेस अध्यक्ष गोरखनाना ढोरे, अॅड अशोकराव ढमाले, सुनीलभाऊ चव्हाण, बारकूदादा ढोरे, बाळासाहेब दौंडे, दिलीपराव वहिले, चंदूकाका ढोरे, गंगाराम ढोरे, नितीन भाबंळ, चंद्रकांत झरेकर, शांताराम कुडे आदी आजी माजी जेष्ठ पदाधिकारी मान्यवर आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.


वडगाव शहरात वृक्ष संवर्धन वाढावे यासाठी नागरिकांना आंबा, चिकू, फणस, जांब, पेरू, आवळा, नारळ, जांभूळ, निंबू, वड, पिंपळ आदी प्रकारचे वृक्ष मोफत वाटप करण्यात आले.


कार्यक्रम प्रसंगी वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे, उपनगराध्यक्ष प्रमिला बाफना, गटनेते नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, सुनील ढोरे, चंद्रजीत वाघमारे, दिलीप म्हाळसकर, शारदाकाकू ढोरे, माया चव्हाण, पूनम जाधव, पुजा वहिले, मीनाक्षी ढोरे तसेच गणेश जाधव, सिद्धेश ढोरे, शरद ढोरे, महेश कुडे, अमर चव्हाण, महेंद्र ढोरे, नितीन चव्हाण, अनिल दंडेल, शेखर वहिले, प्रविण ढोरे, आनंद बाफना, संदिप कुडे, गणेश म्हाळसकर, राजेश ढोरे, गणेश ढोरे, सुनील चव्हाण, सचिन कडू, भाऊसाहेब ढोरे, निलेश म्हाळसकर, अतुल राऊत, मयुर गुरव, संदिप ढोरे, समीर दौंडे तसेच मोरया मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि शहारातील कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.