वडगाव मावळ पोलीस ठाण्याला आयएसओ,तर लोणावळा शहर पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलीस ठाणे ( A +) प्रमाणपत्र….

0
169

मावळातील वडगाव पोलीस ठाणे व लोणावळा शहर पोलीस ठाण्याला वेगवेगळे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

वडगाव पोलीस ठाण्याला आयएसओ प्रमाणपत्र तर लोणावळा शहर पोलीस ठाण्याला जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस ठाणे ( A + ) प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी ( आयएसओ ) प्रमाणपत्र व लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांनी ( स्मार्ट पोलीस ठाणे A + )हे प्रमाणपत्र स्वीकारले आहे.त्यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.