Sunday, September 24, 2023
Homeपुणेवडगाववडगाव मावळ येथील कु. समर्थ जाधव यास उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर..

वडगाव मावळ येथील कु. समर्थ जाधव यास उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर..

वडगाव : वडगाव शहरामधील मल्हार रेसीडेन्सी या सोसायटीमध्ये राहणार्‍या जाधव कुटुंबीयांचा लाडका चिरंजीव कु.समर्थ याची मराठी चित्रपट सृष्टीत उत्तुंग गगनभरारी अवघ्या 8 ते 9 वर्षाच्या समर्थने मराठी चित्रपट सृष्टीत आपले नाव लौकिक केले आहे. पुढे प्रदर्शीत होणारा”फिरस्त्या ” या मराठी चित्रपटात अभिनय करत असलेल्या कु. समर्थ यास उत्कृष्ठ अभिनेता हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्वीडन व सिंगापूर या अकरा देशामधील 24 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये एकूण 53 पुरस्कार जाहीर करण्यात आले यात कु. समर्थ जाधव यास उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर करण्यात आला असून वडगाव नगरपंचायत चे नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांनी समर्थ च्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्याला प्रोत्साहन दिले.कु. समर्थ याने मराठी चित्रपट सृष्टीत आंनदीगोपाळ, फिरस्त्या, बळी, काॅलेज डायरी, सरकारमान्य या चित्रपट व्यतिरिक्त मराठी लघुपट, वेबसिरीज, जाहीरात आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

“फिरस्त्या”या प्रदर्शित होणार्‍या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा कु.समर्थ जाधव यांचे कुटुंबीय मूळचे मळोली, माळशिरस येथील असून खूप हलाकीच्या परिस्थितीत दिवस काढत आपल्या मुलांचे दैनंदिन जीवनमान उंचावण्यासाठी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने वडगाव शहरात वास्तव्यास आहेत. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेला समर्थ हा तीन वर्षांपासून अभिनय क्षेत्रातील मार्गदर्शक प्रवीणजी भारदे यांच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेत आहे.

तसेच त्याचे आई-वडील, बहिण तसेच संपूर्ण जाधव कुटुंबीय तितक्याच उत्साहाने त्याला मार्गदर्शन करत असतात. कोरोनाचा काळ संपल्यानंतर हे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत तरी आपण सर्वांनी बहुसंख्येने समर्थ याचा उत्साह वाढवत हे चित्रपट आवश्य पाहावेत.

- Advertisment -