वडगाव मावळ येथील मोरया कॉलनीतील बंदिस्त ड्रेनेजलाईंचे काम पूर्ण ,मयूर ढोरे यांचे विशेष प्रयत्न !

0
33

वडगांव मावळ : नागराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने वडगांव हद्दीतील प्रभाग क्र.17 येथील मोरया कॉलनीतील नल्यांमध्ये बंदिस्त ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

वडगांव नगरपंचायत माध्यमातून येथील नागरी भागात पाण्याचा नियोजनबद्ध वापर करणे तसेच दुर्गंधीयुक्त जलप्रदुषण रोखण्यासाठी “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत सांडपाण्यावर विविध प्रक्रिया करण्यात येत आहे.

याचाच भाग म्हणून या भागात वाढत्या शहरीकरणामुळे सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने घरात तसेच सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेले सांडपाणी थेट गटार नाल्यात सोडले जाते त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांना आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. याचा विचार करून नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी नगरपंचायत माध्यमातून सांडपाणी प्रक्रियेसाठी मागील काही दिवसांपासून भूमिगत मलनिस्सारण योजना राबवण्याचे ठरवले होते. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक सतरा मधील मोरया कॉलनीतील नाल्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून सांडपाणी नाल्यात न सोडता बंदिस्त ड्रेनेज पाईपलाईन मध्ये सोडण्यात आले आहे.

आता या नाल्यामध्ये फक्त पावसाच्या पाण्याचा प्रवाह असणार आहे. काही दिवसांच्या कालावधीनंतर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर शक्य असून हे पाणी झाडांसाठी, बांधकाम, शौचालये धुणे तसेच नव्याने करण्यात येणाऱ्या चौक सौदर्यींकरणासाठी आदी ठिकाणी वापरता येऊ शकते.

तसेच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करून भूगर्भातील पाण्याचे जतन करण्याकरिता नागरिकांनीही हातभार लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केले आहे.