Thursday, September 28, 2023
Homeपुणेवडगाववडगाव शहरात महालसीकरण मोहिमेस उदंड प्रतिसाद,,,एका दिवसात 1,520 नागरिकांचे लसीकरण..

वडगाव शहरात महालसीकरण मोहिमेस उदंड प्रतिसाद,,,एका दिवसात 1,520 नागरिकांचे लसीकरण..

वडगाव दि.13: वडगाव शहरात नागरिकांचा महालसीकरण मोहिमेस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद.महाविकास आघाडीच्या वतीने आमदार सुनिल आण्णा शेळके व जिल्हा परिषद सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या माध्यमातून तसेच वडगाव नगरपंचायतच्या सहकार्याने महालसीकरण मोहिम शहरातील बारा लसीकरण केंद्रावर राबविण्यात आली होती.

आज एकदिवसीय लसीकरण मोहीमेत सुमारे एक हजार पाचशे वीस नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी वडगाव शहरातील सर्व लसीकरण केंद्रांना भेट दिली. लसीकरणासाठी रांगेत उभे असणाऱ्या सर्वांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मोफत लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी नागरिकांना केले.


शहरात राबविण्यात आलेली महालसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष तसेच वडगाव नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, शहरातील सर्व डाॅक्टर्स, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार आदी जण सहभागी झाले होते.

- Advertisment -