Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडवडविहार येथे रेल्वे ट्रॅक ब्लास्टिंगमुळे किरवली येथील माय-लेकरांचा दुःखद मृत्यू तर अनेक...

वडविहार येथे रेल्वे ट्रॅक ब्लास्टिंगमुळे किरवली येथील माय-लेकरांचा दुःखद मृत्यू तर अनेक जण जखमी !

दोषी अधिकारी वर्गावर कारवाईची मागणी..

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) कर्जत – पनवेल या रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना वडविहिर येथे रेल्वे ट्रॅक चे कामानिमित्त ब्लास्टिंग करताना दगड रस्त्यावर उडल्याने झालेल्या अपघातात कर्जत तालुक्यातील किरवली येथील अपघातात देवकाबाई महादू बडेकर रा. किरवली, ता. कर्जत यांचा जागीच मृत्यू झाला तर सचिन महादू बडेकर या त्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चंद्रकांत म-या मोकल या ६५ वर्ष वृद्धाच्या पायाला दुखापत झाली तर वंदना चंद्रकांत मोकल वय – ६० यांना किरकोळ जखमा झाल्या , विकास भारत भोसले – वय – २३ वर्ष , यांना देखील दुखापत झाल्याने या बेकायदेशीर केलेल्या ब्लास्टिंगमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
या सर्वांना उपचारासाठी प्रथम कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले होते . माय – लेकरांच्या मृत्यच्या या दुःखद घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान कर्जत-चौक या रस्त्यावर रेल्वेच्या ठेकेदारांने ब्लास्टिंग करीत खडक फोडत असताना कर्जत – चौक या महामार्गावर अनेक दगड उडाल्याने या मार्गांवरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या या माय लेकरापैकी आईचा जागीच मृत्यू झाला तर जखमी अवस्थेतील मुलाला उपचारासाठी कर्जत येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा ही मृत्यू झाला.या ब्लास्टिंगमुळे अनेक गावांना हादरा बसत असल्याने अपघातानंतर संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले.
घटनेचे गांभीर्य ओळखत खालापूर तहसिलदार अय्युब तांबोळी , अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे , खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला , कर्जतचे विजय लगारे , खालापूरचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार , सुर्यवंशी व पोलीस टीम आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान हे ब्लास्टिंगचे काम करत असताना खबरदारी म्हणून रस्ता बंद करणे गरजेचे होते , तर ब्लास्टिंगच्या कांड्या किती क्षमतेच्या आहेत , याची परवानगी घेतली होती का , रेल्वेचे अधिकारी त्या ठिकाणी होते का , खालापूर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले गेले का , तहसीलदार यांनी शेजारी गावे असताना ब्लास्टिंगची कशी परवानगी दिली , मग सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती , पोलीस प्रशासनाने यांत वेळीच हस्तक्षेप का नाही केला , दुःखद मृत्यू झालेल्या व अनेक जण गंभीर जखमी झाले यांस जबाबदार कोण ? यांत दोषी असलेल्या सर्व अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची संतप्त मागणी नागरिकांमधून होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page